Headlines :
Home » , , , » सेरेना, जोकोविचचे धुव्वाधार विजय

सेरेना, जोकोविचचे धुव्वाधार विजय

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:47 AM

न्यूयॉर्क - सेरेना विल्यम्स आणि नोव्हाक जोकोविच यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठताना धुव्वाधार विजय मिळविले. जोकोविचने अर्जेंटिनाच्या कार्लोस बर्लोक्‍यूविरुद्ध दोनच; तर सेरेनाने हॉलंडच्या मिशेला क्रॅंज्जेकविरुद्ध एकच गेम गमावला. सेरेनाने पहिल्या फेरीत दोनच गेम गमावले होते. सेरेनासमोर व्हिक्‍टोरिया अझारेन्काचे आव्हान असेल. "नंबर वन' कॅरोलिन वॉझ्नीयाकीनेही अरांता रुसविरुद्ध दोनच गेम गमावले.
जोकोविचने यंदाच्या मोसमात दोनच सामने गमावले आहेत. या स्पर्धेपूर्वी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती; पण आता त्याने विलक्षण तंदुरुस्ती पुन्हा कमावल्याचे दिसून आले. 74व्या स्थानावर असलेल्या बर्लोक्‍यूला पहिला गेम जिंकून खाते उघडण्यासाठी एक तास सहा मिनिटे इतकी दीर्घ वाट पाहावी लागली. बर्लोक्‍यू 28 वर्षांचा असून, त्याने 50व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याचा खेळ अगदीच खराब झाला नाही; पण जोकोविचचा धडाकाच थक्क करणारा होता. त्याने बेसलाइनवरून वेग आणि अचूकता राखली. त्याची सर्व्हिस छान झाली; तसेच परतीचे फटकेही चांगले बसले. बर्लोक्‍यूने तिसऱ्या सेटमध्ये एक ब्रेक नोंदवून थोडाफार दिलासा दिला.
"व्यावसायिक टेनिसपटू...'
जोकोविच म्हणाला, ""आम्ही व्यावसायिक टेनिसपटू आहोत. आमच्यासमोर आव्हान असते आणि ते अर्थातच जिंकण्याचे असते. मी बर्लोक्‍यूला ओळखतो. तो चांगला तरुण आहे. तिसऱ्या सेटच्या मध्यास मला त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. तो कसून प्रयत्न करीत होता. लढाऊ खेळाबद्दल मला त्याचे कौतुक करावे लागेल.'' रॉजर फेडररने 93व्या स्थानावरील इस्राईलच्या ड्यूडी सेला याच्यावर 77 मिनिटांत मात केली. यानंतर त्याची क्रोएशियाच्या मरिन चिलीचशी लढत आहे.
81 "वीनर्स', चुकाही तेवढ्याच
सातव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मॉंफीसचे आव्हान मात्र संपुष्टात आले. स्पेनच्या जुआन कार्लोस फेरेरोकडून तो पाच सेटमध्ये पराभूत झाला. पाच तास चाललेल्या लढतीत मॉंफीसने 21 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याने 81 "वीनर्स' मारले; पण टाळता येण्यासारख्या चुकासुद्धा (अनफोर्स्ड एरर्स) तेवढ्याच केल्या. फेरेरोने "लव्ह'ने सर्व्हिस राखत विजय साकार केला. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले.
निकाल ः महिला एकेरी ः सेरेना विल्यम्स वि.वि. मिशेला क्रॅज्जेक 6-0, 6-1. कॅरोलिन वॉझ्नीयाकी वि.वि. अरांता रूस 6-2, 6-0. व्हिक्‍टोरिया अझारेन्का वि.वि. जिसेला डुल्को 6-4, 6-3. एलेना यांकोविच वि.वि. एलेना डॉकीच 6-3, 6-4. फ्रान्सिस्का शियावोनी वि.वि. मिरीयाना ल्युचीच 6-1, 6-1. अँड्रीया पेट्‌कोविच वि.वि. जीए झेंग 3-6, 6-3, 6-3.
पुरुष एकेरी ः नोव्हाक जोकोविच वि.वि. कार्लोस बर्लोक्‍यू 6-0, 6-0, 6-2. रॉजर फेडरर वि.वि. ड्यूडी सेला 6-3, 6-2, 6-2. मरिन चिलीच वि.वि. बर्नार्ड टॉमीच 6-1, 6-0, 6-2. जुआन कार्लोस फेरेरो वि.वि. गेल मॉंफीस 7-6 (7-5), 5-7, 6-7 (5-7), 6-4, 6-4. मार्डी फिश वि.वि. मॅलेक जझिरी 6-2, 6-2, 6-4. टोमास बर्डीच वि.वि. फॅबिओ फॉग्नीनी 7-5, 6-0, 6-0. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा वि.वि. सर्जी बुब्का ज्युनिअर 6-3, 7-5, 6-2.
6-0, 6-0, 6-0 विजय
ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीत एकही गेम न गमावता विजय मिळविण्याचा पराक्रम यापूर्वी स्पेनच्या सर्जी ब्रुगेराने केला होता. फ्रान्सच्या थिएरी चॅंपीयनवर त्याने 6-0, 6-0, 6-0 अशी मात केली होती. जोकोविचचा हा विक्रम थोडक्‍यात हुकला.
Share this article :

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. USTAD SAYEEDUDDIN DAGAR - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger