Headlines :
Home » , » चेल्सीची नॉर्विच सिटीवर मात

चेल्सीची नॉर्विच सिटीवर मात

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:10 AM

चेल्सी संघाने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्विच सिटीवर ३ - १ ने विजय मिळविला . या विजयाने चेल्सीचे तीन सामन्यांत सात गुण झाले आहेत . परंतु , ड्रोग्बाला दुखापत झाल्याने हंगामातील पुढील सामन्यांमध्ये त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे .
नॉर्विचविरुद्ध चेल्सी संघाने आक्रमक सुरुवात केली . सहाव्या मिनिटालाच जोस बोसिंग्वाने अप्रतिम गोल करून चेल्सीचे खाते उघडले . २० यार्डावरून त्याने केलेल्या गोल नॉर्विचचा गोलरक्षकही रोखू शकला नाही . यानंतर चेल्सीच्या खेळाडूंचे आक्रमण नॉर्विच संघाने मध्यांतरापर्यंत थोपवून धरले . पूर्वाधानंतर ग्रँट होल्ट याने ६३ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली . हा गोल म्हणजे चेल्सीने नॉर्विचला दिलेले गिफ्ट होते . ८० व्या मिनिटाला नॉर्विचचा गोलरक्षक जॉन रूडीला रेड कार्ड मिळाले . त्यामुळे त्यांच्या संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले . याचा फायदा घेत ८२ व्या मिनिटाला फ्रँक लेम्पार्डने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून चेल्सीला आघाडी मिळवून दिली . ज्युआन मेटा याने अतिरिक्त वेळेत गोल केल्याने चेल्सीने सामना ३ - १ ने खिशात घातला . मेटाने पदार्पणाच्या सामन्यातच गोल करण्याची किमया केली .
ड्रोग्बा जखमी
चेल्सीला विजय मिळाला ; पण त्यांना ड्रोग्बाला गमवावे लागले . पूर्वाधानंतर गोल करण्याच्या प्रयत्नात असताना त्याची आणि नॉर्विचचा गोलरक्षक रूडीची टक्कर झाली . त्यात ड्रोग्बा जागेवरच कोसळला . त्याच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने मैदानावरच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले . स्ट्रेचरवरून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले .
Share this article :

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. USTAD SAYEEDUDDIN DAGAR - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger